no care of Patients in KTS District General Hospital Gondia  
विदर्भ

तासन्‌तास फिरकत नाहीत डॉक्‍टर, परिचारिका; दररोज फुटतो नातेवाइकांच्या वेदनांचा बांध

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : गरिबांना नवजीवन देणारे, त्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारे रुग्णालय म्हणजे सरकारी रुग्णालय, असे समजले जाते. मात्र, येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय याला अपवाद आहे. या रुग्णालयात रुग्णांवर खऱ्या अर्थाने उपचार होत असतील, यावर विश्‍वासच बसत नाही. वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णांकडे डॉक्‍टर आणि परिचारिका तासन्‌तास फिरकूनही पाहात नाहीत. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराप्रतीच्या नातेवाइकांच्या वेदना दररोज समोर येत आहेत. तरीही रुग्णालय प्रशासनाला पाझर फुटत नाही.
 
जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब नागरिक एवढेच नव्हे, तर लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक औषधोपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाची वाट धरतात. चांगले उपचार होऊन आपण ठणठणीत बरे होऊ, असे प्रत्येकाला वाटते. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथे ठीक होते. गरिबांवर चांगले औषधोपचार केले जात होते. मात्र, सद्यःस्थितीत या रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर आहे.

कधी वैद्यकीय अधिकारी तर, कधी परिचारिका उपलब्ध राहात नाहीत. राहिल्या तर, भरती झालेल्या किंवा भरती होणाऱ्या रुग्णावर वेळीच उपचार करतील, याची शाश्‍वती नाही. डॉक्‍टर ऐकण्याच्या मनःस्थितीत राहात नाहीत.  गंभीर आजाराच्या रुग्णांना "रेफर टू नागपूर"चा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हमखास दिला जातो. त्यांच्या तोंडातून हे वाक्‍य नेहमीच निघते. त्यामुळे या भानगडीत कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. 

ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगितले जाते. मग गरजू रुग्णांना ऑक्‍सिजन का दिला जात नाही. हा प्रश्‍न आहे. रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका तासन्‌तास विनवणी करूनही रुग्णांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. दररोज रुग्णांच्या नातेवाइकांच्या वेदनेचा बांध फुटतो आहे. मात्र, त्यांच्या वेदनांकडे किंबहुना रुग्णांच्या गंभीर प्रकृतीकडे लक्ष द्यायला रुग्णालय प्रशासनाकडे वेळ नाही, असेच दिसते. 

 
बाई गंगाबाईचा कारभार वाऱ्यावर

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा कारभारदेखील वाऱ्यावर आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांना पद्धतशीरपणे बाजूला कसे सारता येईल, याचे नियोजन येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केल्याचे दिसते. प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांना रेफर टू रजेगाव किंवा नागपूर असा सल्ला दिला जातो. रुग्ण महिलेचे नातेवाईक विनवणी करूनही त्यांचे काहीही ऐकले जात नाही. इतके भयाण वास्तव या रुग्णालयाचे आहे. 


आपबिती सांगताना अश्रू अनावर 

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार कसा आहे, याची प्रचिती देणारा व्हिडिओ समोर आला आहे. सालेकसा तालुक्‍याच्या इसनाटोला येथील सुरेंद्र टेंभरे यांनी आजारी पत्नीला केटीएस रुग्णालयात आणले. मात्र, तिच्या प्रकृतीकडे तेथील डॉक्‍टरांनी ढुंकूनही पाहिले नाही. याबाबतची आपबिती सांगताना सुरेंद्र टेंभरे यांना अश्रू अनावर झाले. केटीएस रुग्णालयात काहीच व्यवस्थित नाहीत. लोकप्रतिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.



खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार

सध्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांत मनमानी कारभार सुरू आहे. या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्याकरिता शासनाने नोडल अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी 
येथील समाधान ग्रुपने केली आहे. खासगी रुग्णालयातील बेडची उपलब्धता सार्वजनिक करावी, जेणेकरून सर्वसामान्य गंभीर रुग्णांना उपचार करणे शक्‍य होईल. आजघडीला शहरातील धनाढ्य लोक कोविड-19 ची लक्षणे नसतानासुद्धा खासगी रुग्णालयात भरती होत आहेत. त्यामुळे नेहमीच खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, असा संदेश दिला जातो. याचा परिणाम गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना भोगावा लागतो. तसेच सर्वसामान्य लोकांकडून मोठी रक्कम जमा केल्याशिवाय खासगी दवाखान्यात प्रवेश मिळत नाही आणि आणि रुग्ण बरे झाल्यावर त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जातात. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्याकरिता शासनाने नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी समाधान ग्रुपचे संयोजक अमर वराडे यांच्या नेतृत्वात आलोक मोहंती, हरीश तुळसकर, दलेश नागदवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली.


संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT